‘परीक्रमा’औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा प्रथम वर्ष बी.फार्मसीचा १००% निकाल.

दिनांक ३१ जुलै, काष्टी/श्रीगोंदा:

येथील मा.ना.श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परीक्रमा’ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी. फार्मसी चा निकाल १०० % लागला अशी माहिती महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख प्रा. राम निखाते व अकॅडेमिक इन्चार्ज प्रा. श्रीकांत दरेकर यांनी दिली.

कुणाल बनकर (CGPA – 8.42) प्रथम क्रमांकाने, मेघा खताळ (CGPA – 8.35) द्वितीय क्रमांकाने, तर पंकज खुरांगे, श्रद्धा आमटे व प्रीती भोईटे (CGPA – 8.32) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची व महाविद्यायाने दरवर्षीप्रमणे यशाची परंपरा यावर्षी देखील राखली आहे.अशी माहिती माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

परीक्रमा शैक्षणिक संकुलात दर्जेदार शिक्षणावर अधिकाधिक भर दिला जातो. अशी माहिती संस्थेचे (संचालक) प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेच्या (अध्यक्षा) डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, (सचिव) विक्रमसिंह पाचपुते, (संचालक) प्रतापसिंह पाचपुते, (संकुल संचालक) डॉ. विजय पाटील, एम.बी.ए. (डायरेक्टर) डॉ.तानाजी दबडे व (मुख्य प्रशासकीय अधिकारी) डॉ. अनिल पुंड यांनी अभिनंदन केले.

स्रोत:(परिक्रमा शैक्षणिक संकुल, काष्टी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading