पेडगांव येथे कोरोनाचे दोन रुग्ण पॉजिटिव..

दिनांक ३१ जुलै,पेडगांव/श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव येथील ४० वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला कोरोना पॉजिटिव आढळुन आले असुन, या रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव आले आहेत.

पॉजिटिव आलेले रुग्ण श्रीगोंदा येथे एका ज्वेलर्सकडे काम करीत होते. यामुळे पेडगांवचा काही भाग चौदा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्यात आलेे आहे. अशी माहिती डॉ. मोहीनी खामकर व डॉ. नवनाथ काशिद यांनी दिली.

तर, ग्रामीण भागत देखील कोरोना रोगाचा शिरखाव मोठ्या प्रमाणत होत असल्याने, नागरिकांनी घाबरुन न जाता दक्षता घेणे गरजेचे आहे. विना कारण घराबाहेर फिरु नये. असे आवाहन पेडगांवचे सरपंच, पो. पाटील, ग्रांमसेवक यांनी नागरिकांना केले आहे.

(स्रोत:शफीक हवालदार यांनी दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading