समतेच्या वाटेने चालनारा एक निधड्या छातीचा कार्यकर्ता हरपला: अँँड.डाॅ.अरुण जाधव

दिनांक ३१ जुलै,श्रीगोंदा:

समतेच्या वाटेने चालनारा एक निधड्या छातीचा कार्यकर्ता हरपला.. अशे प्रतिपादन लोकाधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँँड. डाॅ.अरुण जाधव यांनी श्रीगोंदा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, शिल्पकार, शीघ्रकवी, बहुजन चळवळ व आंबेडकरवादी चळवळीचे नेते दिवंगत जालिंदर (तात्या) घोडके यांचे आदरांजली सभेत केले .

ते पुढे म्हणाले, निळी टोपी किंवा फेटा अंगावर निळे कपडे, निळा पंचा , उपरणेही निळेच असा सर्व पेहराव निळा करुन, तात्या आंबेडकरी विचार जनतेपर्यंत पोहोचवत होते. श्रीगोंदा तालुक्यातील आंदोलन उपोषण व सर्वसामान्य जनतेला न्याय, हक्क मिळवून देण्याच्या शर्यतीत तात्या अव्वल होते. तात्यांनी समाजकारण तर केलेच. परंतु, राजकारणही तेवढ्याच जिद्दीने केले .

सभेच्या अध्यक्षस्थानी अँँड .सुभाष (दादा ) डांगे होते यावेळी माजी आमदार राहुल जगताप. जेष्ठ नेते बाबासाहेब भोस. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे. आण्णासाहेब शेलार. युवक नेते विक्रम पाचपुते, मल्हारराव घोडके.टिळक भोस,संपादक अमिन शेख, प्रमोद काळे, जि. प. सदस्य अनिल ठवाळ, बसपाचे सुनिल ओहोळ, रामभाऊ घोडके, नगरसेवक संग्राम घोडके, प्रशांत गोरे, नगरसेविका सोनाली घोडके, सामाजिक कार्यकर्ते नितीन घोडके, प्रकाश लोंढे, निलेश गायकवाड इ. मान्यवरासह सामाजिक व राजकिय श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी त्यांचे नातेवाईक यांनी रक्षा पाण्यात विर्सजीत न करता आंब्यांच्या झाडाचे रोपन केले व रक्षा आंब्याच्या झाडाच्या बुंध्याला टाकली. शोकसभेचे सुत्रसंचालन बौद्धाचार्य सतिश ओहोळ (सर) यांनी केले. तर, आभार गोरख घोडके यांनी मानले.

स्रोत:(जालिंदर तात्या घोडके यांची शोकसभा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading