श्रीगोंदा तालुका : एक शैक्षणिक चळवळ..

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने श्रीगोंदा तालुक्यात सामाजिक जाणिवेतून काम करत असलेल्या ‘ अग्नीपंख फाउंडेशन ‘ मार्फत यावर्षी ‘ डॉ.अब्दुल कलाम बेस्ट स्कुल अवॉर्ड आणि बेस्ट स्कूल अॅण्ड लीडर ‘ हे कॉफीटेबल बुक तयार केले . हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल. – गुलाब सय्यद ( गटशिक्षणाधिकारी , पं.स.श्रीगोंदा )

img_20200731_1042029034335435149583064.jpg

अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या व घोडनदी व भीमानदीची सीमा लाभलेला श्रीगोंदा तालुका . एक शैक्षणिक चळवळ उभारून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे .

महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास एका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे . प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे स्वप्न आहे . त्या दिशेने श्रीगोंदा तालुका शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे . हे ध्येय गाठण्यासाठी तालुक्याने कंबर कसली आहे . तालुक्यातील प्राथमिक , माध्यमिक शिक्षण शाळा व्यवस्थापन समिती , स्थानिक स्कूल कमेटी , पालक या प्रवासात सामिल होऊन साथ देण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली आहे . जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ३६६ तसेच प्राथमिक व माध्यमिक खाजगी शाळा ११२ असा मिळून ४७८ शाळा तालुक्यात असून विद्यार्थी संख्या एकूण ५६ हजार २४३ आहे . यामध्ये जिल्हा परिषदेचे १ ९ हजार ६१४ व खाजगी शाळा ३६ हजार ६२ ९ एवढी आहे . यामध्ये मुलांची संख्या ३१ हजार ०१ ९ असून मुलींची संख्या २५ हजार २२४ आहे . जिल्हा परिषदेच्या शाळेवर १ हजार ८३ व खाजगी शाळेवर १ हजार ११८ असे मिळून २ हजार २०१ शिक्षक आहेत . तालुक्यात जिल्हा परिषदेची १ उर्दू शाळा असून इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात .

१ गटशिक्षणाधिकारी , १ शालेय पोषण आहार अधिक्षक , तालुक्यातील शैक्षणिक बीट ५ , केंद्र २४ , गटसाधन केंद्रात गटसमन्वयक १ , डाटा एंट्री ऑपरेटर १ , विशेषज्ञ २ , विशेष शिक्षक यांच्यामार्फत पर्यवेक्षीय यंत्रणेचे कामकाज चालते .तालुक्यात २४ कृतीशील शाळा आहेत . ३ ९ आय.एस.ओ शाळा आहेत . तालुक्यात ३६६ डिजिटल शाळा आहेत .

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यामध्ये पारनेर , नगर नंतर श्रीगोंदा तिस – या क्रमांकावर आहे . गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी आयोजित करण्यात येते . पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गतवर्षी अनुक्रमे ३६ व ४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले . एन.टी.एस , एन.एम.एम.एस नवोदय बालचित्रकला स्पर्धा , विविध गुणदर्शन या स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येते . दरवर्षी विविध ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते . स्थानिक क्षेत्र भेटीचे आयोजन दरवर्षी तालुक्यातील ३ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत मोफत इस्त्रो सहल आयोजन केले जाते . समाजकल्याण शिष्यवृत्ती , गुणवत्ता शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती , अस्वच्छ व्यवसायात काम सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती , मोफत विद्यार्थीनी पास इत्यादी अनेक लाभ दिला जातो . शालेय पोषण आहार आणि राष्ट्रीय मध्यान्ह भोजन अंतर्गत पोषण आहार व पूरक आहाराचे वाटप करण्यात येते .

विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व भौतिक सुविधा निर्मितीसाठी वृक्षलागवड संवर्धन यासाठी जवळपास दरवर्षी स्नेहसंमेलने , श्रमदान , बाल आनंद मेळावा , देणगीदार इत्यादी मार्फत मोठा निधी शाळेच्या प्रगतीसाठी उपयोगात आणला जातो .(नमूद माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या कालखंडातील आहे)

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading