राजापूर (ता. श्रीगोंदा) येथील श्री संत गोविंद बाबा मंदिरातील पादुका चोरी..

दिनांक २१ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गोविंद बाबा मंदिरातील पादुका चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रात्री घडली आहे. गावातील नागरिकांनी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आणली.

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. गावकरी आणि भाविकांत या घटनेमुळे संतापाचे आणि दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि पादुका परत मिळाव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

स्रोत:(पत्रकार पवन रणदिवे)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading