नगरपालिका मार्फत शहरातील गणेश मूर्ती एकत्रितपणे विसर्जीत..

दिनांक १ सप्टेंबर,श्रीगोंदा:

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी श्रीगोंदा नगरपालिकेने शहरातून घराघरात बसविलेल्या गणेश मूर्ती सजविलेल्या ट्रॅकटरमध्ये जमा करून, येथील पंचायत समिती वसाहती मधील विहिरीत या मूर्ती विसर्जीत केल्या. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी, (तहसीलदार( चारुशीला पवार, (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव, (गटनेते) मनोहर पोटे, (गटविकास अधिकारी) प्रशांत काळे, (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, सतिश मखरे, प्रशांत गोरे, संतोष खेतमाळीस यांच्या उपस्थितीत हे विसर्जन करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी देवरे, स्थानिक पालिका प्रशासनामार्फत ३ दिवस शहरात याविषयी आवाहन करण्यात आले होते. तर, तहसीलदार पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मांडलेल्या शहर तसेच तालुक्यात एक गाव एक गणपती या संकल्पनेला सर्वांचा प्रतिसाद मिळाला.

येथे बोलतांना पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले की, कोरोना संकटात शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास प्रतिसाद दिला. एकूण १५ ठिकाणी गणपती बसविण्यात आले होते. पेडगाव येथे २ ठिकाणी मुलांनी गणपती बसविले. त्याचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.

मनोहर पोटे म्हणाले की, शहरात एक गाव एक गणपतीची संकल्पना बाबासाहेब भोस यांनी मांडली, शहरात एकच ठिकाणी गणपती बसविण्याचा निर्णय झाला. घराघरात बसविण्यात आलेल्या गणेशाचे विसर्जनसाठी नागरिकांनी बाहेर पडू नये, यासाठी पालिकेने शहरातून गणेश मूर्ती घेऊन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे पोटे यांनी आभार मानले आहेत.

एक गाव एक गणपती उपक्रम अंतर्गत शहरातील शेख महंमद बाबा पटांगणातील गणेश मूर्ती देखील दान देऊन, विसर्जन करण्यात आली. नगरपालिकेने शहरात जसे सर्वांच्या मूर्ती घेतल्या त्यापद्धतीने येथील मूर्ती देखील पालिकेच्या ट्रॅकटर मध्ये देण्यात आली. याचेही नागरिकांनी कौतुक केले आहे.

स्रोत:(श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनामार्फत मिळालेली माहिती)

Leave a Reply