गावठी पिस्टल आणि काडतुसे जप्त, तीन आरोपी अटकेत.. श्रीगोंद्यातील एकाचा समावेश.. शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

दिनांक २७ सप्टेंबर २०२४ श्रीगोंदा/शिरूर:

शिक्रापूर पोलिसांनी तालुका शिरूर मधील निमगाव म्हाळुंगी येथे मोठी कारवाई करत २ गावठी पिस्टल (रिव्हॉल्वर) आणि २ जिवंत काडतुसे असा १ लाख एक हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणात ओंकार कृष्णराज आदक (वय १९, रा. होमाचीवाडी, टाकळी भिमा), चेतन सुनिल शिंदे (वय २१, रा. निमगाव म्हाळुंगी) आणि शरद देवीदास माने (वय २१, रा. पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना गोपनीय बातमीदाराने मिळालेल्या माहितीच्या आधारे, खुनातील आरोपी चेतन शिंदे व त्याच्या साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

या धडक कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी केले. या पथकात सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे आणि इतर कर्मचारी सहभागी होते. आरोपींच्या ताब्यातून शस्त्र जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

स्त्रोत:(ऑनलाईन वृत्त)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading