श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय क्वार्टर्समध्ये गळफास घेतलेल्या मुलीचा मध्यरात्री मृत्यू.

दिनांक २५ जुलै,श्रीगोंदा:

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामधील परिचारिकेजवळ राहत असलेल्या मुलीने काल दिनांक २४ जुलै रोजी दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. यानंतर काल दिवसभर श्रीगोंदा येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास उपचारास प्रतिसाद देत नसल्याने, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील पंख्याला सुताची दोरी गळ्याभोवती बांधून गळफास घेण्याचा तिने प्रयत्न केला होता.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक २४ जुलै रोजी आरोपी धनंजय विष्णुपंत कांबळे याने नमूद मुलीस लग्नाचे अमीष दाखवुन तीचेशी बळजबरीने शरिरसंबंध ठेवले व नंतर तीने शरिरसंबंधास नकार दिल्याचे कारणावरुन तीचा मानसिक छळ करुन, शिवीगाळ करुन धमकी दिली व त्याचे लग्न झाले ही बाब लपवुन, तीचेशी सुमारे १ वर्षापासुन बळजबरीने शरिरसंबंध करुन, तीची फसवणुक केल्याने. ती मानसिक छळामुळे व फसवणुकीमुळे तसेच आरोपी विजय विष्णुपंत कांबळे व त्याची पत्नी यांनी या प्रकरणात मुलीलाच दोषी ठरवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे पीडितेने दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याविषयीची फिर्याद प्रशांत बेळमकर यांनी दिली. या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध भा.द.वि. ३०६, ३७६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नमूद आरोपी फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत असल्याचे समजते आहे.

पीडित मुलीवर शारीरिक अत्याचार झाला असल्याने, त्या मुलीला अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

स्रोत:(पोलिसांत दाखल झालेली फिर्याद व मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading