दिनांक २५ जुलै,श्रीगोंदा:
आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही सहा महिन्यांपासून आरोपींवर कुठलीही पोलीस कारवाई होत नसल्याने व आरोपीकडू मिळणाऱ्या धमक्यांमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दत्तात्रय अंकुश खोरे व रंजना दत्तात्रय खोरे रा. दौंड मूळ गाव काष्टी ता. श्रीगोंदा या पीडित पतिपत्नीने उपोषणाचे आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय अंकुश खोरे व पांडुरंग अंकुश खोरे रा. काष्टी ता. श्रीगोंदा हे सख्खे भाऊ असून, त्यांच्यात जमीन वाटपावरून वाद चालू आहे. पांडुरंग खोरे व त्याचे नातेवाईक हे सतत दत्तात्रय व त्याच्या कुटुंबाला मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्रास देत आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि.२९/१/२० पासून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तरीही वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने अद्याप कारवाई केली नसल्यामुळे दत्तात्रय अंकुश खोरे व त्यांची पत्नी रंजना दत्तात्रय खोरे हे उपोषणाला बसले होते.
उपोषणाची दखल घेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन व आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन त्यांचे उपोषण आंदोलन सोडले.
(स्रोत: पत्रकार विजय उंडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती व निवेदन)
