“श्रीगोंद्याहून परतताना टेंभुर्णीत भीषण लूट”..

दिनांक २० एप्रिल २०२५, श्रीगोंदा/टेंभुर्णी:

पुणे-सोलापूर महामार्गावर भुईंजे गावाच्या हद्दीतील यशराज हॉटेलसमोर शनिवारी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास तीन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत व डोळ्यात चटणी टाकून आई–मुलाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली.

विशाल रामचंद्र सुर्यवंशी (वय ४२, रा. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांची आई शकुंतला सुर्यवंशी हे श्रीगोंदा (जि. नगर) येथून नातेवाईकाच्या लग्नाहून परतत असताना झोप येत असल्याने त्यांनी कार (एमएच-२५/आर-३१२०) महामार्गाच्या कडेला उभी करून झोप घेतली होती.

त्याचवेळी २२ ते २५ वयोगटातील तिघा चोरट्यांनी विशाल सुर्यवंशी यांच्या गळ्याला कोयता लावत धमकी दिली व डोळ्यात चटणी टाकून साडेतीन हजार रुपये लुटले. यानंतर त्यांच्या आईकडील बारा तोळे सोन्याचे दागिने — दोन सोन्याच्या पाटल्या, दोन बांगड्या, दोन अंगठ्या, कानातील झुबे-फुले व गळ्यातील चेन असा एकूण सहा लाख तीन हजार पाचशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.

चोरट्यांनी पोलिसांकडे जाऊ नये म्हणून धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. विशाल सुर्यवंशी यांनी काही अंतरावर जाऊन ११२ वर कॉल करत घटनेची माहिती दिली. टेंभुर्णी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र चोरटे पसार झाले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading