दिनांक २४ नोव्हेंबर २०२५,श्रीगोंदा:
बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी शिवारात मालट्रक चालकाला कोयत्याचा धाक दाखवून ४०,०००/- रुपये लुटणाऱ्या दोन आरोपींना बेलवंडी पोलीस आणि अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी शिताफीने अटक केली आहे.
दिनांक २३/११/२०२५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, शिवाई पार्कसमोरील गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) शिवारात मालट्रक (क्र. GJ१५AV ४४२५) नादुरुस्त होऊन थांबला होता.
यावेळी ट्रक चालक सागर जीवन कदम हे गाडीत झोपले असताना, मोपेडवरून (क्र. MH१२TL२९४८) आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेल्या कोयत्याने ट्रकची काच फोडली.
त्यांनी गाडीत प्रवेश करून चालकाला कोयत्याचा धाक दाखवला, मारहाण केली आणि बॅगेत ठेवलेले ४०,०००/- रुपये जबरीने चोरून नेले.
या घटनेनंतर सागर कदम यांच्या तक्रारीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी अनिकेत विलास गव्हाणे आणि अदित्य दादाभाऊ पवार हे गव्हाणवाडी शिवारात आले आहेत.
त्यानुसार, बेलवंडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा (अहिल्यानगर) यांची दोन तपास पथके तातडीने रवाना करण्यात आली.
गव्हाणवाडी परिसरात शोध घेत असताना, आरोपी हिंगणी गावाच्या शिवारात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकांनी हिंगणी शिवारात सापळा रचून आरोपींना मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई पवार करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे सो, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत विभाग श्री प्रविणचंद्र लोखंडे सो, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (स्था.गु.शा अहिल्यानगर)

यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक श्री पवार, पोलीस हवालदार भाउसाहेब यमगर, पोना गांगर्डे, पोकॉ दादासाहेब क्षिरसागर, विनोद पवार, योगेश भापकर, पोकॉ शिपनकर (बेलवंडी पो.स्टे) आणि पोसई मेढे, सफौ गांगर्डे, पोहेकॉ लोटके, पोकॉ ससाणे, पोकॉ साखरे (स्था.गु.शा अहिल्यानगर) यांनी यशस्वीपणे पार पाडली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
