श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक, परिसरात घबराट.

श्रीगोंदा, २० एप्रिल २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने लिंबोणी येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपीने अश्लील चाळे केले, तर त्याच्या साथीदाराने मोबाईलवर फोटो काढले. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. सध्या डीवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबीयांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिक आणि पीडितेच्या नातेवाइकांनी प्रशासनाकडे टवाळखोर, शाळा-कॉलेज परिसरात गोंधळ घालणारे आणि मजनुगिरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

अशा गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन परिसरातील रहिवाशांनी केले आहे.

(स्रोत: पत्रकार संभाजी घोडके)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading