महादजी शिंदे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश.

दिनांक १३ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता आठवी) या वर्गाचा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला.

या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयातील इयत्ता पाचवी चा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५५ विद्यार्थी पात्र ठरले. तसेच, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

इयत्ता पाचवीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तन्मय पाडळे:२६०, धैर्यशील शिंदे:२६०, अवधूत सोनवणे:२२८, संस्कार वाळके:२२६, यशराज उबाळे:२२६, स्वरूप वाघमारे:२२०, राजवर्धन मोहिते:२०८, उदय राजे कणसे:२०४, अभिजीत टकले:२०२, आर्यन पांढरकर:१९८, प्रथमेश आळेकर:१९८, पुष्कर रणनवरे:१९८, साईराज इगावे:१९८, जयदत्त बर्डे:१९६, संचितकुमार खेतमाळीस:१९६, यश सुद्रिक:१९६ तन्मय तनपुरे:१९२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

तर, इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये कोठारी प्रतिक महादेव:२१८, जमादार सुफियान जुबेर:२१२, पाटील हर्षद सूर्यकांत:२१०, खेडकर आदर्श राजेंद्र:२०६, दरेकर तन्मय दिलीप:२०२, आरडे ओम दादासाहेब:१९८, वाव्हळ अथर्व रवींद्र:१९७, मांढरे ज्ञानेश्वर दादासाहेब:१९६ असे
एकूण २३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

यासाठी (इ.५ वी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख) श्री. लक्ष्मीकांत खेडकर, (मार्गदर्शक शिक्षक) सौ. युगंधरा पाडळे, श्रीमती सोनाली मचाले, सौ. ज्योत्स्ना लोखंडे तसेच (८ वी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख) श्री.प्रदिप पाडळे, (मार्गदर्शक शिक्षक) श्री. बापुसाहेब जाधव, श्रीमती मंजूश्री चोथे यांनी मार्गदर्शन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाचे (प्रभारी मुख्याध्यापक) बाळासाहेब जाधव, (पर्यवेक्षक) उत्तम बुधवंत, (गुरुकुल प्रमुख) विलास लबडे, (ज्येष्ठ शिक्षक) विलास दरेकर, (रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी) तुकाराम कन्हेरकर, (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य) बाबासाहेब भोस, (स्थानिक स्कूल कमिटी सदस्य) तुकाराम दरेकर व रवीशेठ दंडनाईक तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

स्रोत:(सचिन झगडे सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading