दिनांक १३ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात हजारोच्या संख्येने बांधकाम कामगार कार्यरत आहेत. मात्र, थोड्याच जणांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंद करण्यात आली आहे. उर्वरित बांधकाम कामगार शासनाच्या व प्रशासनाच्या विविध योजनांपासून दुर्लक्षित राहिलेले आहेत. साधारण ८० टक्के कामगार हे अशिक्षित आहेत.यांना गेल्या काही वर्ष्यापासून नोंदणी करण्यास सांगितली आहे. मात्र, संबंधित कार्यालायात नोंदणी झालेल्या कामगारांना, पाच वर्षे नोंदणी लागू असल्याचे सांगितले जात आहे.
श्रीगोंदा तहसीलदार यांना कामगारांनी निवेदन देऊन निदान आपल्या मार्फत सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येक नोंदणीकृत कामगारास संजय गांधी योजना व पिवळे रेशन कार्ड या आपल्या कडील योजनेचा कामगारांना लाभ मिळून द्यावा अश्या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी, कामगारांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन श्रीगोंद्याचे तहसीलदारांना देत, भावना शासनापर्यंत पोहचवण्याची विनंती निवेदनामार्फत केली आहे. तसेच, संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, आ.बच्चू कडू (कामगार राज्य मंत्री), पालकमंत्री अहमदनगर, कामगार आयुक्त अहमदनगर, खा.सुजय विखे यांना प्रत सादर करण्यात आली आहे.
या निवेदनावर नितीन रोही (प्रथम शहरध्यक्ष प्रहार), बाळू दांडेकर, धनु दांडेकर, बंडू कुदळे, भिमा कोठारे, अजय काळे सुखदेव कोठारे, गणेश ससाणे, विश्वास सुडगे, नितीन कांबळे, शरद औटी, संदीप पोकळे सह अनेक कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
स्रोत:(नितिन रोही यांनी प्रसिद्धीस दिलेले माहिती)
