जीएसटी डिपार्टमेंटला लागलेली आग भ्रष्टाचार लपविण्यासाठी केलेले षडयंत्र तर नसेल ना ?- एक शंभुभक्त नागरिक..

जीएसटी डिपार्टमेंटला लागलेली आग भ्रष्टाचार लपविण्यासाठी केलेले षडयंत्र तर नसेल ना ?- एक शंभुभक्त नागरिक..

दिनांक १८ फेब्रुवारी,मुंबई :
माझगाव येथील जीएसटी विभागाच्या भवनामधील आठव्या मजल्याला लागलेली आग ही संबंधित वस्तु व सेवा कर यंत्रणेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी केलेले हे एक षडयंत्र तर, नसेल ना.. अशी शंका आता सामान्य नागरिकांना वाटू लागली आहे.
माझगांव येथील जीएसटी भवनच्या ८ व्या मजल्यावर सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले असले तरी आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र जीएसटी भवनातील जीएसटी बाबतची अनेक महत्वाच्या कागदपत्रांचा मोठा साठा असल्याने या आगीत सर्वच कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन ही आग लागली ? की लावली ? अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
शिवाय सध्या ३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा हिशोब दाखविण्याची वेळ जवळ आली असतानाच ही घटना घडली असल्याने तसेच हा विभाग सरकारचा मुख्य आर्थिक श्रोत म्हणून GST कड़े पाहिले जाते.या विभागातुन तुन भरपूर प्रमाणात पैसा जमा होत असतो आणि त्याच डिपार्टमेंटला आग लागल्याने हा प्रकार म्हणजे घोटाळा दाबण्यासाठी अथवा महत्वाच्या कागदपत्रांची जाळपोळ करण्याच्या उद्देशाने झाले ? अथवा केले नसेल ना..? अशी अनेकांना शक्यता वाटू लागली आहे.कारण मागेही मंत्रालयात असाच प्रकार घडला होता.अनं सर्व घोटाळे आगीत ख़ाक झाल्याने भ्रष्टाचार पचवला गेला होता ? आताही भ्रष्टाचार लपवण्याच्या उद्देशाने तर आग लावली नसेल ना ? अशा अनेक शंका नागरिकांना येऊ लागल्या असल्याने नागरिकांमध्ये आगीच्या चर्चेचे चांगलेच गुरहाळ रंगले आहे.
(वार्तांकन व छायाचित्र:पत्रकार,लक्ष्मीकांत शिर्के)

Leave a Reply