कर्जत तालुका प्रेस क्लबचे संमेलन व पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न..
01 mins
कर्जत तालुका प्रेस क्लबचे संमेलन व पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न..
दिनांक १८ फेब्रुवारी,कर्जत:
तालुका प्रेस क्लबचे संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मिरजगाव येथे काल उत्साहात संपन्न झाला.युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.मंचावर ज्येष्ठ विचारवंत अन्वर राजन,लोकमंथनचे संपादक डॉ.अशोक सोनवणे,पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,ज्येष्ठ नेते ए.बी.चेडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड,प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा.किरण जगताप उपस्थित होते.
यावेळी डॉ.अशोक सोनवणे (बहुजनहित पत्रकारिता पुरस्कार),डॉ.ए.बी.चेडे (ज्ञानयोगी पुरस्कार),मंजुषा गुंड (नारी शक्ति पुरस्कार),बापू सुपेकर (लोकाभिमुख अधिकारी पुरस्कार),मोनाली तोटे (विकास रत्न पुरस्कार),नीलम साळवे (समाज भूषण पुरस्कार), डॉ.पंढरीनाथ गोरे (स्वास्थ्य सारथी पुरस्कार),प्रणिता भोसले (अनाथ जिव्हाळा पुरस्कार),दत्ता खामगळ (कला भूषण पुरस्कार),योगेश कोपनर (क्रीडा भूषण पुरस्कार)यांना उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह,मानपत्र देवून विविध पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.
सदगुरु उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्धवराव नेवसे, डॉ.विलास कवळे,अभय बोरा,सचिन कुलथे,अंकुश जंजिरे,संपतराव बावडकर,लहू वतारे,युक्रांदचे आप्पा अनारसे,संजय शेलार,विजय पवार,डॉ.नवनाथ टकले, रामदास सूर्यवंशी,प्रकाश पठाडे,वैभव देशमाने,दत्तात्रय तनपुरे,फारुख बेग,दिपक कोठारी,सागर जाधव,विनोद सोनवणे, बाबूशेठ भंडारी,माजी सरपंच डाॅ.शुभांगी गोरे,उषाताई चेडे,सारंग घोडेस्वार,कुमार नहार,शंकर धतुरे यांच्यासह मिरजगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष किशोर कांबळे,कार्याध्यक्ष भाऊसाहेब तोरडमल,सचिव विनायक चव्हाण, खजिनदार प्रा.सोमनाथ गोडसे, विश्वास रेणुकर,संतोष रणदिवे,मिलिंद राऊत,दादा शिंदे,महंमद पठाण आदींनी परिश्रम घेतले.