कौटुंबिक कारणावरून श्रीगोंद्यातील तरुणास पुण्यात मारहाण.

कौटुंबिक कारणावरून श्रीगोंद्यातील तरुणास पुण्यात मारहाण.

दिनांक १८ फेब्रुवारी,पेडगाव, श्रीगोंदा:
कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात तरुणास चार जणांनी लाकडी दांडक्‍याने मारहाण केली आहे. ही घटना दिघी,पुणे येथे २७ जानेवारी रोजी घडली. राजकुमार साहेबराव दिवटे (वय ३५ रा.पेडगाव, ता.श्रीगोंदा,जि. अहमदनगर)असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
त्यांने शनिवारी(दि.१५)रोजी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, दत्तात्रय ज्ञानदेव शिंदे (वय २९, रा.चौधरी पार्क,दिघी),नीलेश शिवाजी रंधवे (वय २८,रा. गायकवाड नगर,दिघी), विकी पवार (पूर्ण नाव,पत्ता माहिती नाही) आणि पप्पू नामदेव शिंदे (वय २७, रा. कात्रज,पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोसिलांनी दिलेल्या माहितीनुसार,२७ जानेवारी रोजी फिर्यादी दिवटे हे माहेरी आलेल्या आपल्या पत्नीला आनण्यासाठी दिघी येथे आले होते.त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून कौटुंबिक कारणावरून फिर्यादी यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण करून, गंभीर जखमी केले. वादा नंतर दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीं विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading