श्रीगोंद्यातील मावळ्यांची रायगडावर स्वच्छता मोहीम.

श्रीगोंद्यातील मावळ्यांची रायगडावर स्वच्छता मोहीम.

img-20200216-wa00346687965944681950562.jpg
गडावरील स्वच्छता करून तेथील कचरा सोबत दिलेल्या गुणांमध्ये भरताना शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे मावळे (छाया : पत्रकार,योगेश चंदन)
दिनांक १८ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन या महाराष्ट्रात दुर्गभ्रमंती करणाऱ्या संस्थेच्या दुर्गवेड्याकडून गेली तीन वर्षापासून अखंड रायगड ट्रेकिंग व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
याही वर्षी शिवजयंती निमित्त फौंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ट्रेकिंग मोहीम आयोजित करून तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
शिवजयंती निमित्त ट्रेकिंग व दुर्गसंवर्धन यासाठी नावाजलेली शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या वतीने गेली ३ वर्ष अखंडपणे राबविण्यात येणाऱ्या रायगड मोहिमेत रायगडावरील मनोरे परिसर,गंगासागर तलाव,महादरवाजा व खाली जाणाऱ्या पायी वाटेवर स्वच्छता मोहीम करण्यात आली.गडावरून खाली पायी उतरताना रस्त्यामध्ये जो प्लॅस्टिक कचरा दिसेल तो उचलून जवळ असणाऱ्या गोण्यात गोळा करण्यात येऊन,एकूण सहा मोठ्या गोणी प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.संपूर्ण गडउतार मार्गावरील कचरा गोळा करून रायगडच्या पायथ्याशी आणला व तेथे असणाऱ्या कचरा कुंडीत जमा केला.
छत्रपती शिवरायांंनी अखंड आयुष्य घालवले हे स्वराज्य उभं करायला,आणि गडकिल्ले उभे करायला,आपल्याला एक दिवस नाही का भेटू शकत हेच स्वराज्यातील गडकिल्ले राखून ठेवण्यासाठी. पुढील पिढीसाठी जतन करण्यासाठी महाराजांसाठी/गडकिल्यांची स्वच्छता करण्यासाठी महिन्यातील एक दिवस नाही का काढू शकत आपण ? या विचाराने हे शिवदुर्ग ट्रेकर्सचे मावळे भारावून हे शिवकार्य करत आहेत.
झाडाझुडुपांमध्ये पडलेल्या प्लॅस्टिक बाटल्यांचा खच पाहून मन खिन्न होत होते. रागही येत होता. वाईटही वाटत होते, परंतु आपले शिवकार्य म्हणून हा कचरा आमचे मावळे गोळा करत होते.शिवदुर्ग ट्रेकर्सचे मावळे स्वच्छता करत असतानाच गडावर आलेले इतर मावळे स्वतःचे हातातील प्लॅस्टिक बॉटल पिशिवीत टाकत होते. तर काहीजण त्याच्या बॉटल इतस्ततः फेकून देत होते. एक छोटेसे कार्य केल्याचा अत्यानंद मात्र मावळ्यांचे चेहऱ्यावर फुलुन येत असल्याची माहिती शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.

Leave a Reply