महाविद्यालयीन विद्यार्थीनी सह्याद्री ओहोळचे जीवामृत निर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

दिनांक २३ सप्टेंबर(पिसोरेखांड/श्रीगोंदा):

पिसोरेखांड तालुका श्रीगोंदा येथील कृषिकन्या सह्याद्री सुनिल ओहोळ या कृषी महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दिनांक २३ सप्टेंबर रोजी गावांतील शेतकऱ्यांना व उपस्थितांना जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी बहुतांश ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते. अगदी अभ्यासपूर्वक मांडलेल्या या माहितीचे येथील उपस्थितीतांनी कौतुक केले.

सह्याद्री ओहोळ ही अहमदनगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखेपाटील फाऊंडेशन कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षामध्ये शिकत आहे. नमूद प्रात्यक्षिका दरम्यान सह्याद्रीने उपस्थित शेतकऱ्यांना स्लरी निर्मिती, सेंद्रिय खते, सेंद्रिय कीटकनाशकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.धोंडे, प्रा.के.एस.दांगडे, प्रा.ए.व्ही.भोसले यांचे मार्गदर्शन लाभले असून, नमूद माहिती विशद करतांना या गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थानां मार्गदर्शन करतांना सह्याद्री ओहोळ..

स्रोत:(मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading