शेतीसाठी काढलेले सुमारे लाखाचे सावकारी व बॅकेचे कर्ज डोईजड झाले. त्यामुळे श्रीगोंदा शिरूर तालुक्याच्या सीमा रेषेवरील वडगाव शिंदोडी या गावात राहणारे सखाराम बापू पवार सन २०१५ मध्ये यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी जीवन यात्रा संपवली. कर्जाचा डोंगर असताना सखाराम पवार यांच्या पत्नी लताबाई यांनी आपले दुख बाजूला ठेवून. मोडलेल्या प्रपंचाला पुन्हा आकार देऊन. बॅक, सोसायटीचे कर्ज फेडण्याचे नियोजन केले. गेल्या दहा वर्षांत कर्जाला कंटाळून श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे बहूतेक कुंटुबांची वाताहत झाली. पण लताबाई पवार सारख्या काही जिद्दी रणरागिनींनी या आस्मानी संकटातुन स्व: ताला सावरले त्यामुळे ही कुंटुब पुन्हा उभी केली आहेत. ही चांगली बाब आहे.
सखाराम पवार यांना घोड धरणाच्या काठावर वडीलोपार्जीत पाच एकर शेती. आई, पत्नी आणि आकाश, ऋतुजा, कोमल ही तीन मुल सहा माणसांच कुंटूब… सावकाराने साडेचार लाखाच्या कर्जापोटी एक एकर जमीन नावावर लिहून घेतली. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी व कुंटुबाला पत्र्याच्या दोन खोल्या बांधण्यासाठी बँकेचे आठ लाख व एक लाखाची सोसायटी काढली. हे कर्ज फिटणार नाही या धास्तीने सखाराम पवार यांनी दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी आत्महत्या केली त्यामुळे सखाराम पवार यांचे कुंटूब आडचणीत सापडले.
अशा परिस्थितीत लताबाई पवार पतीच्या आत्महत्येचा शोक बाजूला ठेवून फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घेण्याचा संकल्प केला. आकाश, ऋतुजा आणि कोमल यांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना अस्तव्यस्त झालेल्या शेतीची घडी बसविताना. ऊस, कांदा, गव्हाचे पिकांचे नियोजन केले. शेतीला लागणाऱ्या खतासाठी व दुध व्यवसायातून दैनंदिन खर्ज भागविण्यासाठी दोन गायी, दोन म्हशी खरेदी केल्या. गुरांचा गोठा बांधला आणि आकाश ने बारावी केली महाविद्यालयीन शिक्षण बाहेर करण्याचे ठरले. ऋतुजा ही दहावी पास झाली असुन तिला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा ट्रस्ट ने दत्तक घेतले आहे त्यामुळे ऋतुजाला शिक्षणासाठी पंख मिळाले असून कोमल सध्या नववीत आहे.
लताबाई यांनी पहिल्या टप्यात मुलांच्या शिक्षणासाठी लक्ष दिले आणि कर्ज माफीची प्रकिया पुर्ण होताच बँकेचे कर्ज फेडण्यासाठी आर्थिक नियोजन केले आहे. घरातील कारभारी माणुस अर्ध्यावर साथ सोडून गेला असताना. लताबाई पवार सारख्या रनरागीणीने पुन्हा जीवनाच्या मैदानात उतरली आणि मोठ्या जिद्दीने संसारात परिवर्तन करण्यासाठी दाखविलेले धाडस हे कौतुकास पात्र आहे.
वडगाव शिंदोडी परिसरातील ग्रामस्थांनी सामाजिक जाणिवेतून लताबाई पवार यांच्या कुंटुबाला आधार देण्याचे काम केले आहे. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे व मंडल अधिकारी शिवाजी शिंदे यांनी लाख मोलाचे मार्गदर्शन केले. यातुन लताबाई पवार यांना प्रोत्साहन मिळाले आहे. लताबाई पवार लवकरच आडचणीचा चक्रव्यूह भेदून बाहेर येणार आहेत.
आता रडायच नाही
आकाश पवार म्हणाला कि, मी अकरावीत असताना वडीलांनी आत्महत्या केली. आठ दिवस आमची आई जेवली नाही. वडिलांचा दहावा झाला आणि तुम्ही शाळा शिका मी शेतीत कष्ट करते हिम्मत हरायची नाही. आता रडायच नाही लढायच असे सांगितले. आमची आई दररोज उशिरा झोपते लवकर उठते काम सोडुन तीला काहीच दिसत नाही. तिला मदत व्हावी म्हणून मी बाहेरुन कॉलेज करण्याचे ठरविले आहे.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.
