दिनांक ५ एप्रिल, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील गरजू दिव्यांग व्यक्तीची गरज लक्षात घेऊन सौ.मानिषाताई कोठारे माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्या यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
सामाजिक जाणिवेतून सध्याच्या अडचणीच्या काळात जनतेला दिलासा देण्याचे काम ते त्यांचे परीने करत आहे. तालुक्यातील आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, चांडगाव, घुंगलवडगाव, बेळवंडी कोठार, सुरुडी, घोटवी गावातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप शंकर आण्णा कोठारे प्रगतशील शेतकरी बेलवंडी कोठार यांचे उपस्थितीत करण्यात आले आहेत.
तालुका प्रशासन आरोग्य विभाग ग्रामसेवक इत्यादी सर्व लोक आपला जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर काम करत आहेत. त्याच्या सुरक्षेसाठी देखील सॅनिटायझेर व मास्कचे वाटप करण्यात आले. श्रीगोंदा पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा व आरोग्य केंद्र आढळगाव येथे जाऊन सुरक्षा किट चे वाटप शंकर आण्णा कोठारे यांनी केले. सदर वाटप करते वेळी प्रशांत काळे(गट विकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा) व डॉ रामकृष्ण जगताप(सहा. गटविकास अधिकारी)आणि नागेश लोखंडे हेही उपस्थित होते.
