विहिरीत आढळला शीर.. दोन हात आणि एक पाय नसलेला मृतदेह: श्रीगोंदा तालुक्यात खळबळ..

दिनांक १२ मार्च २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी परिसरात आणि बेलवंडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात एका अज्ञात पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साधारणपणे २५ ते ३० वर्षे वयोगटातील या व्यक्तीचा मृतदेह पोत्यात दगड भरून विहिरीत टाकण्यात आला होता.

बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, मृतदेह पोत्यातून बाहेर काढण्यात आला. विशेष म्हणजे या मृतदेहाला डोके, दोन हात आणि एक पाय नव्हता. तसेच पोत्यात दगड भरलेले असल्याने तो जाणूनबुजून विहिरीत टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण दानेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा निर्घृण खून आहे की अन्य काही, याचा तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे मारुती कोळपे करीत आहेत. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading