नागपूर सह विदर्भात गरजूंना शंभुसेना,माजी सैनिक आघाडी कडून मदत..

दिनांक १२ मे,नागपूर :

नागपूर सह विदर्भातील विविध ठिकाणी गरजुंच्या मागणीनुसार दिनांक १२/०५/२०२० रोजीच्या टप्यात शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने नागपूर मधील गरजू, गरीब व बेरोजगार कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक कार्यास(शंभुसेना प्रमुख)श्री.दिपक राजेशिर्के, (माजी सैनिक आघाडीचे) श्री.सुनिल काळे,(शंभुसेना मार्गदर्शक)लक्ष्मीकांत राजेशिर्के, (शंभुसेना प्रदेश संपर्क प्रमुख)श्यामजी देशकर, (शंभुसेना विद्यार्थी आघाडीचे नेते)सुमित आंभोरे, (शंभुसेना महिला आघाडीच्या)प्रियंका आंभोरे, विदर्भ विभाग, नागपूर जिल्हा पदाधिकारी, आदींसह शंभुभक्त, शंभुसैनिक, माजी सैनिक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान लाभले.

लवकरच विदर्भातील गरजूंच्या मागणीनुसार विदर्भात विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचे वाटप होणार असल्याची माहिती शंभुसेना संघटनेचे श्यामजी देशकर व सुमित आंभोरे, यांनी दिली. तसेच १४ मे रोजी येणारी शंभुजयंती चौकात साजरी न करता घरा- घरात सध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन शंभुसेना प्रमुख मा. दिपक राजेशिर्के यांनी करत, शंभुजयंती निमित्त राज्यभर सामाजिक अंतर ठेवून गरजूंना मदती कराव्यात, असे नम्र आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading