मा.अपर जिल्हाधिकारी अहमदनगर  सुहास मापारी साहेब यांची निवडणूक प्रशिक्षण वर्गास भेट.

दिनांक ७ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

३७ अहमदनगर लोकसभा निवडणूक संदर्भात पहिला प्रशिक्षण वर्ग आज दिनांक ७ एप्रिल २०२४ रविवार रोजी तुळशीदास मंगल कार्यालय व छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे HANDS – ON प्रशिक्षण सकाळ व दुपार सत्र या दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी कर्मचारी अशी एकूण  साधारणतः १५०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गास मा.अपर जिल्हाधिकारी अहमदनगर सुहास मापारी यांनी सर्व अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना मार्गदर्शन केले. केंद्राध्यक्ष यांची कामे व जबाबदारी तसेच इतर मतदान अधिकारी यांची कामे व जबाबदारीचे स्वरूप विस्तृत स्वरूपात सांगितले.

मतदानाच्या दिवशी, अगोदरच्या दिवसाची कामे व मतदान दिवस याची कामे आणि मतदान संपल्यानंतरची सर्व प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती गौरी सावंत मॅडम यांनी केले. तसेच, मतदान कक्ष उभारणी, सुरक्षा व्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले.

निवडणूक निर्णय अधिकारी ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी अहमदनगर मा.श्री सिद्धराम सालीमठ यांनी व्हिडिओद्वारे निवडणूक प्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. क्षितिजा वाघमारे नायब तहसीलदार निवडणूक  मा. पंकज नेवसे व सर्व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading