“प्रेमसंबंधाचा भीषण शेवट: रणजीतचा खून, मयूरीची आत्महत्या”.! श्रीगोंद्यातील एकाला अटक..!

दिनांक २६ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा/ बीड:

नाजूक प्रेमसंबंधातून घडलेल्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. २३ डिसेंबर रोजी रणजीत गिरी (वय २२) या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकण्यात आला होता. या प्रकरणाला आणखी दुर्दैवी वळण मिळाले आहे. या घटनेनंतर मयूरी (वय १८), युवती जी रणजीतवर प्रेम करत होती, तिने आज (बुधवारी) दुपारी २:०० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

रणजीत गिरी हा युवक हॉटेलवर आचारी म्हणून काम करत होता. त्याच्यावर मयूरीचे प्रेम होते. मात्र मयूरी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी रणजीतविरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर रणजीतला अटक करण्यात आली होती आणि तीन महिन्यांपूर्वीच जामिनावर त्याची सुटका झाली होती. सुटकेनंतरही हे प्रेमप्रकरण सुरूच राहिले होते.

२३ डिसेंबर रोजी रणजीतचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कुकडी कालव्यात फेकण्यात आला होता. नागरिकांनी कालव्यातून मृतदेह वाहून जाताना पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर गळा आणि हातावर दोरीच्या खुणा दिसून आल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिसांनी संतोष जाधव (खांडवी), ऋषिकेश बोरकर (वडझिरे, ता. पारनेर), उद्धव ऊर्फ संतोष मांडगे (आढळगाव, ता. श्रीगोंदा) आणि खांडवी येथील एका महिलेला अटक केली आहे. या आरोपींनी रणजीतला मारहाण करून त्याचा खून केल्याचा संशय आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

स्त्रोत:(ऑनलाईन वृत्त)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading