श्रीगोंदा परिसरात मोठा आवाज: विमानातील ‘सुपर सोनिक बूम’ की काही वेगळे.? चर्चेला उधाण..!

दिनांक २७ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहर आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये काल (२६ डिसेंबर) सायंकाळी सुमारे ८:०० वाजता प्रचंड मोठ्या आवाजामुळे खळबळ उडाली. या आवाजाचा उगम काय आहे..? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, या आवाजाने शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या आवाजाने अनेकांच्या घरातील भांडी, पीओपी, आणि वस्तू जमिनीवर पडल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. काहींनी हा आवाज विमानातून झालेल्या ‘सुपर सोनिक बूम’चा असल्याचा अंदाज वर्तवला आहे, तर काहींनी हा आवाज स्फोटासारखा वाटल्याचे म्हटले आहे.

स्थानिक प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आवाजाच्या तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

काय आहे ‘सुपर सोनिक बूम’?
सुपर सोनिक बूम म्हणजे विमान किंवा इतर एखादी वस्तू ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करताना निर्माण होणारा मोठा आवाज होय. हा आवाज वातावरणीय दाबाच्या बदलांमुळे निर्माण होतो. अनेकदा लष्करी विमानांच्या चाचण्या किंवा मिशन दरम्यान असे आवाज निर्माण होतात.(Google)

या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरणासाठी प्रशासनाकडून माहिती समोर येईल. नागरिकांनी घाबरून न जाता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

जाहिरात..

Leave a Reply