दिनांक १४ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने तसेच कचरा गाडीमध्ये हॉस्पिटलचे वापरून झालेले साहित्य ज्यात सुया, बाटल्या,हॅन्ड ग्लोज,ड्रेसिंग केलेले मटेरियल,गोळ्याचे पाकीट,बरेच अवशेष या ठिकाणी दररोज येतात.
यासाठी नगर वरुन हॉस्पिटलचे वापरून झालेले मटेरियल हे नेण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला स्वतंत्र यंत्रणा असतांना नमूद, हॉस्पिटलमधले मटेरियल नगरच्या गाडीत न टाकता ते श्रीगोंदा नगरपालिकेच्या गाडी मध्ये टाकून याठिकाणी या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.

वॉल कंपाऊंड चे काम सुरू करण्याचे अस्वासन देऊन गेली सहा महिने झाले आहेत.तरी अजून पुढील कारवाई केलेली नसल्याने, या परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास येथील रायकर वस्ती,वडवकर वस्ती,शिंदे वस्ती येथील लोकांना या कचरा डेपोचा व कुत्र्यांचा सतत त्रास होत आहे.याच्यावर पालिका कुठलाही गांभीर्याने विचार करत नाही.
नमूद ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली अश्या पध्दतीने दवाखान्यातील औषधे व इतर वापरलेल्या वस्तू फेकल्या जात असताना,या माध्यमातून जैविक कचरा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कचरा डेपोत वाढत्या श्वानांच्या उपद्व्यापामुळे जैविक कचरा किंवा निरुपयोगी जीवास्माचें तुकडे येत असल्याची शंका बळावत आहे.
