दिनांक १४ मार्च (घारगाव,श्रीगोंदा):
साईकृपा कला महाविद्यालय घारगाव तालुका श्रीगोंदा येथील हिंदी विषयाचे प्रा.प्रदीप पंडित सर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएचडी प्रदान केली.
हिंदी लेखिकाओंकी आत्मकथाओं मे व्यक्त युगिन परिवेश या विषयावर त्यांनी संशोधन केले.त्यांना मार्गदर्शक म्हणून,डॉक्टर बी.डी.वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.दिनांक ५ मार्च २०२० रोजी त्यांना सन्मानपूर्वक ही पदवी नांदेड विद्यापीठाने बहाल केली.
या त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांचे दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे,संस्थेच्या सचिव अर्चनाताई पानसरे,संस्थेचे रजिस्ट्रार कल्याण शिंदे,साईकृपा कला महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम कांबळे त्यांचे सहकारी प्रा.गौतम साळवे,प्राध्यापिका मंगल गायकवाड प्रा. दीपक पवार,प्रा.भरत ठुबे,डॉ. दळवी, प्राचार्य डॉ.जगदीश राठोड,प्रा.गणेश लगड, श्री.अंबादास थिटे व शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
