दिनांक १४ मार्च,श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलामधील महादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय कठीण अशी रयत प्रज्ञाशोध (आर.टी.एस) परीक्षेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले आहे.
विद्यालयातील एकूण ६० विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.त्यातील यशस्वी विद्यार्थी खाडे सिद्धांत संदीप (राज्यात आठवा), झगडे हर्षल सचिन(राज्यात दहावा),वाव्हळ प्रणव संजय(राज्यात चौदावा), गिरमकर विवेक अशोक(राज्यात पंधरावा) क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करून,पुढील तीन वर्षे संस्थेच्या वतीने विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख संजय मादेवार,मंजुश्री चोथे,अंकुश हिंगणे, प्रदिप पाडळे ,अजय गाडेकर, संदीप कोळपे,रामचंद्र भांगरे, अमोल डोईफोडे,संजय बर्डे,गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधिर साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब भोस, प्रा. तुकाराम दरेकर, रवीशेठ दंडनाईक तसेच विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर,उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत, गुरुकुलप्रमुख विलास लबडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
