दिनांक १४ मार्च (घारगाव,श्रीगोंदा):
शिंदेवाडी,घारगाव येथील शाळेत स्न्हेसमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. मुलांनी बहारदार नृत्य नाटिका संत गोरा कुंभार व दिंडी नृत्य तसेच इंदोरी कर स्टाईल कीर्तनासह विविध गुण दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून,प्रेक्षकांची मने जिंकली.
सदर कार्यक्रमास सभापती सौ.गीतांजली ताई पाडळे मॅडम(जिल्हा बँकेचे संचालक)श्री.दत्तात्रय पानसरे, (घारगावचे सरपंच) सौ.अरुणा ताई खोमणे,(उपसरपंच)सौ.सरिता ताई बडवे,(शिक्षण अधिकारी) ज्ञानेश्वर कलगुंडे,(केंद्रप्रमुख)चंद्रकांत कलगुंडे,(शाळा व्य .समितीचे अध्यक्ष)विजय शिंदे,(उपाध्यक्ष) सौ. रोहिणी शिंदे,(ग्रा.पं.सदस्य)सोपान शिंदे,सर्व सदस्य ,ग्रामस्थ ,पालक माता भगिनी उपस्थित होते.
यावेळी शाळेला ग्रामपंचायत तर्फे १ लाख ५७ हजार रुपयांचा निधी देन्याचे ठरलं.तसेच पेविंग ब्लॉक बसविण्यासाठी रामदास होले साहेब यांच्या तर्फे २५ ब्रास ब्लॉक व त्यासाठी लागणारा इतर खर्च व मजुरी आप्पासाहेब शिंदे मा सरपंच यांच्या तर्फे देण्याचे ठरले. दत्तात्रय पानसरे साहेब यांनी ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली.
शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यामधे दुसरा क्रमांक आल्याने,पदाधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यपक संजय रायकर व सह शिक्षीका सोनाली रणदिवे मॅडम यांचा विशेष सपत्नीक सत्कार केला . लोकवर्गणीतून शाळेचा शिक्षकांनी कायापालट करून शाळा अतिसुंदर व डिजीटल करण्यात आली आहे. स्नेसंमेलनाचे सूत्रसंचालन सोनाली रणदिवे मॅडम यांनी केले.तर,उपस्थितांचे आभार व स्वागत संजय रायकर सर यांनी केले .
