स्त्रीयांना हक्क अधिकार संविधानामुळेच :प्रशांत चव्हाण.

दिनांक १४ मार्च (काष्टी,श्रीगोंदा):

स्त्रीयांना वैदिक काळामध्ये चुल आणी मुल ऐवढया पुरतेच ठेवले होते.परंतु राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले,रमाई व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागाच्या प्रेरणेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रींना हक्क व अधिकार दिले.म्हणुनच महिला अधिकारी व पदाधिकारी झालेत असे प्रतिपादन प्रशांत चव्हाण यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे जनता कन्या विद्यालय काष्टी,विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी चव्हाण बोलत होते.ते पुढे म्हणाले की,मनुस्मृती ने महिलांना गुलाम बनवले होते. तर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे सर्व महिलांना या गुलामगिरीतून मुक्त केले आहे.

या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिक मंजुषा चावरे या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत खामकर यांनी केले.बाळासो शिंदे ,जाधव राम, गायकवाड पद्ममा, राऊत मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मांडे यांनी केले.तर, आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक रविंद्र पवार मानले. कार्यक्रम यशस्ववी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख तातळे शंकर यांचे सह विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर यांनी अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading