कचराबाई शंकर मदने यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.

दिनांक १४ मार्च(लोणी व्यंकनाथ,श्रीगोंदा):

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील कचराबाई शंकर मदने यांचे रविवार दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी ०६:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे श्री.अभिमान शंकर मदने(मुलगा),श्रीमती.चंद्रभागा अभिमान मदने(सुन), श्री.शांतीलाल अभिमान मदने(नातू),श्री.दत्तात्रय अभिमान मदने(नातू) असा परिवार आहे.

आयुष्यात स्वतःसाठी काही न करता कुटुंबातील सर्वासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मनात नातवांना खुप शिक्षण द्यायचं निश्चय होता. नातू शांतीलाल अभिमान मदने याच्यावर शेवटपर्यंत खुप जीव होता.त्यांना चांगले शिक्षण देत समाजातील लोकांची सेवा करण्याचा संदेश आईंनी दिला आहे.

पीडितांना मदत करत समाजसेवा करायची हा त्यांचा हेतू होता.तो शब्द नातवाने आजपर्यंत पाळला आहे.
हा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ०७:०० वाजता लोणी व्यंकनाथ (महादेव मंदिराच्या माठीमागे) होणार असल्याचे शांतीलाल मदने यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading