दिनांक ११ एप्रिल(चांडगाव,श्रीगोंदा):
कोरोना व्हायरसचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता,सर्व नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आपापल्या घरात आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत चांडगाव येथे लॉकडाऊन दरम्यान सोशल मिडीयाचा यथार्थ वापर होत असल्याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
‘ऑनलाईन चांडेश्वर वसंत” व्याख्यानमालेच्या माध्यमांतून विविध क्षेत्रांत अग्रणी असलेल्या अभ्यासकांची व्याख्याते म्हणून निवड केली असून,सामाजिक माध्यमातील व्हॉट्सअप द्वारे घरबसल्या ह्या व्याख्यानांची मेजवानी श्रोत्यांना मिळत आहे.
व्याख्यानमालेची सुरुवात डॉ. संजय चाकणे प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय,इंदापूर आणि(सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी केली. तर,श्री. रावसाहेब दरेकर (चेअरमन, इको ग्रीन फाऊंडेशन आणि संचालक, लर्न इंडिया युनिव्हर्सिटी, मुंबई), यानंतर अनुक्रमे हभप श्री. मनिषानंदजी महाराज (श्री.शांकरी विद्याधाम आश्रम), हभप श्री.सुरेश महाराज घालमे (वारकरी अभ्यासक,भोसरी,पुणे) डॉ. जवाहरलाल भंडारी (उपप्राचार्य,गांधी महाविद्यालय, कडा), प्रा. श्री.स्वप्निल म्हस्के (सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, दादा पाटील महाविद्यालय,कर्जत), श्री.भाऊसाहेब रसाळ मुख्याध्यापक,(जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, बोराटेवस्ती, जलालपूर) तर शेवटचे व्याख्यान डॉ.नितीन खामकर (तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदा) हे देणार आहेत. या ऑनलाईन व्याख्यानमालेचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.
