Shrigonda#
कूषी पंपाचे भारनियमन बंद करण्यासाठी ऊर्जा मंञ्यांना ई.मेल द्वारे पञव्यवहार.
दिनांक ११ एप्रिल,श्रीगोंदा:
कोरोनाच्या पार्शभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे कुणीही उपाशी राहू,नये. संगळ्यांना भाजीपाला मिळावा,यासाठी शेतकरी बांधव गाव सोडून शेतात राहायला गेलाय. उन्हांतान्हांत काबाडकष्ट करुन भाजीपाला पिकवत आहे.परंतु वीजवीतरण कंपनी शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करत नसल्याने, शेतकऱ्यांचे अतोनात हाल सुरू आहेत.
त्यामुळे कूषी पंपांना २४ तास वीजपूरवठा करण्यासाठी भारनीयम बंद करण्याची मागणी नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांनी उर्जा मंञी नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्शभूमीवर सध्या सगळे उद्योग धंदे, कारखाने बंद आहेत.त्यामुळे वीजेची मागणी खुपच कमी झालेली आहे.नागरीकांची खाण्यापीण्याची हाल होवू नये.म्हणून,शेतकरी शेतातच राब राब राबत आहे. तरीसुद्धा अशा परीस्थीतीतही शासन कूषीपंपाचे भारनीयमन केवळ कूषी पंपांना वीज सवलतीच्या दरात दिल्या जाते.म्हणून बंद करत नाही.असे निदर्शनास येत आहे.ही बाब अत्यंत निषेधार्य आहे.असे डांगे यांनी सांगीतले.या नीवेदनाच्या प्रति ई.मेल द्वारा उर्जामंञी,व संबंधीत वीभागाला पाठवण्यात आल्या आहेत.
