दिनांक ११ एप्रिल,अहमदनगर:
आमदार तथा राज्यमंत्री (महाराष्ट्र) बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्य प्रेरणेने प्रहार जनशक्ती पक्ष,अहमदनगर यांच्या वतीने (प्रहार वारकरी संघटना,प्रदेशाध्यक्ष) ह.भ.प.अजय महाराज बारस्कर,(प्रहार शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष व प्रवक्ते) संतोष पवार,(अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष) मा.सैनिक विनोद सिंग परदेशी, (उपाध्यक्ष) पप्पू शेठ येवले, (जिल्हा सचिव) प्रकाश बेरड ,बाळासाहेब चव्हान,अशोक शिंदे,खंडू झगडे यांच्या पुढाकाराने उपेक्षितांना जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनामार्फत लॉकडाऊन करण्यात आला असून.त्याचे परिणाम स्वरूप साधारण व हातावर पोट असणाऱ्या लोकांचे उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. घराच्या बाहेर पडण्यासाठी बंधन असल्याने, सर्वसामान्य माणसाला अनेक अडचणी भेडसावत आहेत.यात त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदतीचा हात देण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे.
त्यानुसार,अहमदनगर दक्षिण जिल्ह्यामध्ये गोरगरीब व ज्यांच्या हातावरच्या कमाईवर पोट भरत आहेत, अशा गरजूंसाठी व त्यांची चूल पेटवण्यासाठी शंभर पॅकेट गहू ( प्रति पॅकेट ५ किलो ) व शंभर पॅकेट तांदूळ ( प्रति पॅकेट ५ किलो ) शंभर पॅकेट साखर ( प्रति पॅकेट १ किलो )तसेच दररोज १०० गरजूंना जेवण देण्यात येणार असल्याची माहिती परदेशी यांनी माध्यमांना दिली आहे. या सर्व प्रक्रिये दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव तसेच संक्रमणाच्या दृष्टीने सोशल डिस्टन्स ठेऊन या सर्व वस्तूंचे वाटप करायला सुरुवात करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
