श्री. बाळासाहेब नाहाटा यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी.. धुळे जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती..

दिनांक २५ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती आणि अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब नाहाटा यांच्यावर आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पणन मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त संचालक निवडून आणण्याचा करिष्मा दाखवला. त्यांच्या या यशस्वी नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांनी त्यांची धुळे जिल्ह्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

या नियुक्तीबद्दल सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब नाहाटा यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक विस्तार व बळकटी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्त्रोत:(नियुक्ती पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading