एका क्षणात शाम आणि अनिताचा संसार अग्नी तांडवात खाकं झाला..!

दिनांक १८ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

महामानव बाबा आमटे संस्थेच्या माध्यमांतून गायरान भिल्ल वस्तीत गेल्या ६ महिन्यापूर्वी पुनर्वसन प्रश्नावर काम सुरु झाले. अनेक वर्ष ह्या वंचित समाजाला आदिवासी असूनही जातीचा दाखला, रेशनकार्ड आधारकार्ड नाही. बँकेचे तर पुस्तक बाजूलाच.!

असे अनेक प्रश्न समोर आल्यावर महामानव बाबा आमटे संस्थेच्या माध्यमांतून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या पीर वस्तीचा सर्वे सुरु झाला. त्यात भिल्ल समाजाचे आधार कार्ड काढण्यात आले. ह्या पीर वस्तीमधील ८५ लोकांचे आधार कार्ड काढण्यात आले. ३२ लोकांचे रेशनकार्ड नरेगा रोजगार हमी कार्ड, बँकेचे पुस्तके संस्थेच्या माध्यमांतून काढण्यात आली.

श्याम दादू बर्डे हा एक लाभार्थी शाम आणि अनिता वयाने २५ च्या आतील जोडप, अंजली ७ वर्षाची आणि मंजू ५ वर्षाची तर, कार्तिक १ वर्षाचा ६० वयाची आई असा हा श्यामचा संसार ..

दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी भर १ वाजता दुपारी उन्हाच्या चटक्यात पीर वस्तीमधील सपराच्या घराला अचानक आग लागली. शाम आणि अनिता चा सर्व संसार अग्नीमध्ये खाकं झाला. धान्य, कपडे, किरणा सर्व काही जळून गले. ऊस तोडायला घेतलेली उचल हि जाळली.! उचल फेडायची का.? घर उभे करायचे.? हा यक्ष प्रश्न आता शाम आणि अनिताच्या पुढे उभा आहे.

कारखाना सुरू होण्याआधी पोटासाठी मजुरी, मासेमारी करणाऱ्या शामचे घर जळून खाक झाले. सुदैवाने त्याची पत्नी वर्षाच्या लहान बाळाला घेऊन, बाहेर पळाली. तिच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ऊस तोडून एक एक रुपया गोळा करायचा आणि संसार चालायचा. अशी शामची परिस्थिती..! शामचे सर्व अग्नी मध्ये गेले. वस्तीतला आक्रोश व्हिडीओ च्या माध्यमातून पाहायला मिळाला अनं मन सुन्न झाले. ग्रामपंचाय सदस्य मेजर पाचपुते यांनी पाठवलेला व्हिडीओ किल्प पाहून, डोळ्यात कानावर पडलेला आवाजाचा आक्रोश ऐकून डोळ्यात पाणी आले. हाच संसार आता आपण सर्व मिळून उभा करूयात म्हणून आपणास मदतीचे आवाहन अनंत झेंडे यांनी केले आहे..

शामला छप्पर मिळेल तेंव्हा मिळेल. तातडीने त्याला संध्याकाळी चूल पेटवण्यात किराणा, अन्नधान्य, कपडे आणि निवारा हवा होता. तो हि संस्थेने वेळेत त्याला उपलब्ध करून दिला. (संस्थेचे विश्वस्त श्रीगोंद्यातील नामाकीत व्यवसाईक नाव प्रसिद्ध पासून अलिप्त असलेला देव माणूस) यांनी तातडीने ह्या कुटुंबाला घरात असलेले आवश्यक असणारी भांडी अरविंद कासार यांच्या भांडी दुकानात खरेदी करून दिली. अरविंदजी यानी ना नफा.. ना तोटा.. मध्ये मदत करत, शामला आवश्यक कपडे दिली आहेत.

आगीत खाक झालेल्या श्याम आणि अनिताचा संसार आपणास पुन्हा उभा करायचा आहे. म्हणून, महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्थेने त्यांच्या घरासाठी २० उपयोगी असणारी पत्रे उपलब्ध करून दिली आहेत.

आपण ह्या परीवारास आवश्यक काही मदत करा आपल्या सहयोगामुळे शाम आणि अनिताचा संसार उभा राहील.

कार्यालय संपर्क:-

महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर,
मो.क्र.: 9404976833, 9881523733, 9404976832..

स्रोत:(अनंत झेंडे)

जाहिरात:

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading