प्रेषित ह.मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त श्रीगोंदयात रक्तदान शिबिराचे आयोजन..

दिनांक १७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१ रोजी डॉ. इमरान जमादार यांच्या आनंद हॉस्पिटल येथे सकाळी १० ते ४ या वेळेत श्रीगोंदा तालुका मुस्लीम जमात, सहयोग फौंडेशन व रोटरी रक्तपेढी, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या कोविड -१९ मुळे सर्वत्र रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. प्रेषितांचे मानवतावादी विचार घरोघरी पोहचविण्याच्या प्रयत्नातून पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांच्या जयंती निमीत्त दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करुया .. कर्तव्य | बजवूया .. ! आयोजकां मार्फत सर्वांना विनंती करण्यात येते की, स्वतः रक्तदान करून आपल्या मित्र व प्रियजनांनाही रक्तदान करण्यास प्रोत्साहित करावे. व या शिबिरात सहभागी व्हावे.

स्रोत:(पत्रकार,राजू शेख)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading