महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर: ८० बाटल्यांचे संकलन..

दिनांक ६ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

ससाणेनगर सिद्धार्थनगर, साई सेवा ब्लड ग्रुप अहमदनगर, आणि HDFC बँक श्रीगोंदा ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन समाज बांधवांच्या उपस्थितीत झाले. शिबिरात ८० रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले, यावेळी जिल्हा परिषद सिद्धार्थनगरमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या रक्तगटांची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून रक्तदानाद्वारे गरजूंसाठी मदत उपलब्ध करणे हे होते. रक्तदानाचा संदेश देत या उपक्रमासाठी स्थानिकांच्या सहकार्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading