दिनांक ६ डिसेंबर २०२४, बेलवंडी (ता. श्रीगोंदा):
भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आणि विश्वासार्हतेबाबत समाजामध्ये संताप निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, काल बेलवंडी येथे मा. नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशा नुसार EVM विरोधी स्वाक्षरी मोहिमेचे आंदोलन छेडण्यात आले.

या मोहिमेला सुरुवात करण्यासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी आपल्या स्वाक्षरीने या आंदोलनाचा श्रीगोंदा तालुक्यात शुभारंभ केला. या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून, मोहिम २६ डिसेंबर २०२४ पर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावात राबवण्यात येणार आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ, महेशशेठ पवार, प्रशांत पाटोळे, दत्तात्रय सोनवणे,, मिलिंद जाधव, अरुण पठारे, गौतम शिंदे, सोमनाथ वंजारी, पवन रणदिवे, अनिकेत सोनवणे, आदित्य मोरे, प्रशांत शेंडगे, निखिल वायदंडे, प्रेम पवार, संतोष शेलार, अक्षय पवार, अरुण डाके, दादासाहेब लबडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आण्णासाहेब शेलार म्हणाले, “EVM विरोधात समाजात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी झालेले मतदान आणि उमेदवारांना मिळालेली मते यामध्ये विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे EVM यंत्रांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत.”

वंचित बहुजन आघाडीचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ यांनी आंदोलनाच्या पुढील नियोजनाची माहिती देताना सांगितले की, “ही स्वाक्षरी मोहीम तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवून अधिकाधिक नागरिकांच्या सह्या जमा करण्यात येतील. हा मुद्दा देशव्यापी स्वरूपात उचलला जाईल.”
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
