#श्रीगोंदा..”स्वयंभू युवा प्रतिष्ठाण”तर्फे रक्तदान शिबीर संपन्न..

दिनांक ९ मे,श्रीगोंदा:

कोरोना संक्रमण काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाण ने शासनाचे नियम पाळत रक्तदान शिबीर घडवून आणले. स्वयंभू युवा प्रतिष्ठाण ने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्त्व समजून घेत नगर जिल्हात रक्त साखळी मोहीम राबवली आहे.

सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू युवा प्रतिष्ठाणच्या वतीने काम करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. हे लक्षात घेऊन, स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, श्रीगोंदा शाखेने रक्तदान करण्याचे ठरविले. यावेळी स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, श्रीगोंदा शाखेच्या १०३ युवा शिलेदारांनी रक्तदान केले. नातं रक्ताच या उपक्रमांतर्गत गेल्या ४ वर्षापासून अविरतपणे २४ तास रक्तपुरवठा स्वयंभू युवा प्रतिष्ठाण करत आहे. रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून, अहमदनगर जिल्हात स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने रक्त दात्यांची साखळी केली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

गेल्या ४ वर्षात स्वयंभू युवा प्रतिष्ठाण ने १३ रक्तदान शिबीरे केलीत. त्यामध्ये १८०० रक्त पिशव्यांचे संकलन केले असून, ८५० रक्तपिशव्या गरजू रुग्णांना मोफत वाटप केले आहेत व अजूनही करत आहेत. दिनांक ५ मे रोजी आयोजित कार्यक्रमातही श्रीगोंदा शहरातील युवकांनी हिरीरीने सहभाग दाखवत महा रक्तदान केले.

या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रदीप पवार साहेब, तालुका आरोग्य अधिकारी श्री. डॉ. नितीन खामकर, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा डॉ. संघर्ष राजुळे, नगराध्यक्ष शुभांगीताई मनोहर (दादा) पोटे, शारदा विद्या निकेतन चे अध्यक्ष दिपक होनराव, अशोक होनराव व मुख्याध्यापक मखरे सर, आरोग्य विभागाचे पंडित साहेब व लटके साहेब, स्वयंभू युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर नगरे हे उपस्थित होते. Shrigonda .. Blood donation camp conducted by “Swayambhu Yuva Pratishthan” ..

रक्तदान केलेल्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी अंकुर सिड्स प्रा. लि. नागपूर चे संजय सुळे, खुरांगे साहेब व श्रीगोंदा नगरपरिषद चे नगरसेवक महावीर पटवा यांनी बॅग वाटप केले. सदर शिबिरासाठी स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, श्रीगोंदा शाखेला श्री. प्रसाद टकले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी स्वयंभू युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर नगरे, कार्यध्यक्ष सौरभ राऊत, मिडिया प्रमुख पवन क्षिरसागर, जयराज गोरे, धिरज राऊत, अक्षय दांडेकर, रोहन क्षिरसागर, अबरार शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.

स्रोत: स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, श्रीगोंदा

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading