शिक्षकांची Covid 19 ची टेस्ट व लसीकरण न करता, लावलेली सर्व्हेक्षण ड्यूटी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण ?

दिनांक ९ मे, श्रीगोंदा:

श्रीगोदा परिसरातील विविध प्रभागांचे Covid 19 संदर्भात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांना दीली होती. दिनांक २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. यात ८० – ८५% सर्व्हे पूर्ण करण्यात आलेला असून, काही शिक्षकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर हे थांबवले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

नेमणूक केलेल्या शिक्षकांची स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रकारे Covid 19 संदर्भात टेस्ट व लसिकरण केलेले नसल्याचे समोर आले आहे. अश्या अवस्थेत या शिक्षकांना सर्व्हेक्षण ड्यटी लावणे म्हणजे, शिक्षकांबरोबरच सर्व्हेक्षण कुटूंबांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. शिक्षक सुपरस्प्रेडर बनून तालुक्यासह शहरातील प्रभागात सर्वेक्षण करीत फिरल्याचे स्पष्ट होत आहे.Teacher’s test of Covid 19 without testing and vaccination is a sign of irresponsibility of the administration?

सदर शिक्षकांपैकी एखादी व्यक्ति कोविड पॉजिटिव्ह असल्यास सर्वेक्षण करणाऱ्या सर्व कुटुंबाला पॉजिटिव्ह करण्याची शक्यता होती. सदर शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लस देउनच सर्वेक्षण करण्यास पाठवने गरजेचे होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने (श्रीगोंदा तालुका तहसीलदार प्रदीप पवार, श्रीगोंदा पंचायत समिती Bdo प्रशांत काळे, श्रीगोंदा नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे) यांनी याबाबत उदासीनता दाखवत कोणतीही काळजी न घेता शिक्षकांना कामाला धाडले. नमूद प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उदासीन सह बेजबाबदार असल्याचे यातुन समोर येत आहे.(प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.)

स्रोत:(दिनांक २७ एप्रिल ते ३ मे दरम्यानचा सर्व्हे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading