दिनांक :३१ जानेवारी, श्रीगोंदा:
ट्रिपल ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान अजय रंधवे यांनी श्रीगोंदा येथील रहीम खान या बेकरी पदार्थ विकणारे युवक यांची ३ दिवसाची कन्याला ओ निगेटिव्ह (O-) रक्ताची अत्यंत गरज होती. दिवस भर नगर शहरातील तील सर्व रक्त पेढ्यामधे जाऊन चौकशी केली. मात्र, त्यांना अपेक्षित रक्त मिळत नव्हते.
काष्टीतील युवकांच्या संकलपनेतून उभारलेल्या आधार फाऊंडेशन ने रक्तदान करनाऱ्या युवकांची नावे, नंबर, रक्तगट, असलेली लिस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली होती. त्यात पै.अजय याचे नाव होते.
संध्याकाळी ९:०० वाजता अजय यांना नगर मधून आलेल्या फोनवर ओ निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याचे सांगण्यात आले. दुर्दैवाने अजय रंधवे यांच्या घरात २ दिवसापूर्वी त्यांचे चुलते दिवंगत भाऊसाहेब रंधवे यांचे निधन झाल्याने घरात दुःखाचे वातावरण होते. अशातही अजय यांनी होकार कळवला. अनं लगेच स्वत:च्या वाहनातून नगर येथे अर्पण ब्लड बँक मध्ये जाऊन रक्तदान करून ३ दिवसाच्या बाळाला जिवनदान दिले.
यावेळी खान कुटुंबियांना आधार आला. अजय यांचे खान कुटुंब यांनी आभार व्यक्त केले आहे. पै.अजय रंधवे यांच्या या सामाजिक जबाबदारी मुळे त्यांचे मित्रांसह सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
स्रोत:(आधार फाऊंडेशन काष्टी )
