बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या इसमावर कारवाई करा.! अन्यथा, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार..! शेकडो जणांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन प्रशासनास सादर..

दिनांक ३१ जानेवारी, श्रीगोंदा:

बंदुकीचा गैरवापर करत, संस्थेच्या सभासदांना एकटे गाठून, धाक दाखवणे, संस्थे विरोधात आवाज उठवण्यास भाग पाडणे, तसे न केल्यास सभासदांना जीवे मारण्याची धमकी देणे, असे गैरप्रकार करणाऱ्या निवृत्ती खेतमाळीस या इसमा विरुद्ध कारवाई करावी तसेच, त्याची बंदूक जप्त करण्यात यावी. वारंवार लोकांना त्रास देत खंडणीची मागणी करत असल्याने, या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांवर कारवाई करा. अन्यथा, दिनांक १० फेब्रुवारी २२ रोजी पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांचे कार्यालयासमोर सर्व पीडित शेतकरी व पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याचे, निवेदन स्थानिक प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, काळभैरवनाथ उपसा सिंचन पाणी वापर संस्था, ल.पा. तलाव औटेवाडी या संस्थेच्या पदाधिकारी व सभासदांनी निवृत्ती आनंदा खेतमाळीस, राजेंद्र संपत औटी व दिलीप तुळशीराम औटी या इसमां विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

संस्थेचे परिसरातील सभासद व लाभधारक शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी कार्यरत असलेली काळभैरवनाथ उपसा सिंचन संस्था, मागील दीड वर्षांपासून कार्यरत आहे. निवृत्ती खेतमाळीस, राजेंद्र औटी व दिलीप औटी यांच्या मते या संस्थेत गैरकारभार होत असून, तुमच्या विरुद्ध कारवाई करील, त्यातून होणाऱ्या परिणामास तुम्हाला सामोरे जावे लागेल. म्हणत, ते दडपशाही करत आहेत. याबाबत श्रीगोंदा तहसीलदारांकडे त्यांनी नाहक चौकशीसाठी उपोषणाचा अर्ज दिलेला आहे.

अशा पद्धतीने लोकांवर दहशत निर्माण करण्याचे काम नमूद खेतमाळीस व त्याचे साथीदार करत असून, मागेही शासकीय अधिकार्‍यांकडे माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून, उत्तर न मिळाल्यास त्यांनाही दमदाटी करत खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील नामांकित व्यापारी व अल्पसंख्यांक व्यक्ती वैभव दिलीप मेथा यांनाही विनाकारण त्रास देत निवृत्ती खेतमाळीस यांनी २७ सप्टेंबर २१ रोजी प्रत्यक्ष भेटून, जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत या व्यक्ती विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर २९ नोव्हेंबर २१ रोजी निवृत्ती खेतमाळीस यांनी भटके-विमुक्त समाजाचे मोहन सूर्यवंशी या व्यक्तीस किरकोळ कारणावरून दमबाजी करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. अशी दहशत करून साधारण लोकांवर गैरमार्गाने वचक बसवण्याचा प्रयत्न करत असल्याने, या प्रकरणीही निवृत्ती खेतमाळीस या इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. यावेळी स्थानिक प्रशासनाने त्याच्या या कृत्याबद्दल लेखी समज देत सोडले होते.

मात्र, सदरील इसमाच्या गैरकृत्याचा आलेख वाढत चाललेला आहे. प्रशासनाने दिलेले समजही तो व्यक्ती जुमानत नसल्याचे समोर येत आहे. काळ भैरवनाथ संस्थेमार्फत प्रत्येक लाभधारक शेतकरी हा फक्त दिवसा तलावातून पाणी शेतीसाठी वापरत असतांना, निवृत्ती खेतमाळीस व त्याचे साथीदार रात्री-अपरात्री तलावावरील डिपीच्या दरवाजांचे कुलुपं तोडून, मोटारी चालू करतात. यामुळे तलावातील पाण्याचा अपव्यय होतोय. याबाबत समजावूनही संस्थेच्या सभासदांना बंदुकीचा धाक दाखवून, दमबाजी करत असल्याचे येथील पदाधिकारी व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बंदुकीच्या तालावर सर्वसामान्य शेतकरी, भटके-विमुक्त समाजाचे कुटुंब व अल्पसंख्यांक समाजाच्या व्यापाऱ्यावर दहशत करत, अनेकांना वेठीला धरण्याचा गैरप्रकार निवृत्ती खेतमाळीस व त्याचे साथीदार सतत करीत आहेत. तर, अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्ते वापरासही अडथळा निर्माण केलेला आहे. प्रशासनाने दिलेले लेखी समजही धुडकावत वारंवार लोकांना छळण्याचे व वेठीला धरण्याचे काम करत असल्याने, नमूद इसमावर कायदेशीर कारवाई करत, त्याची बंदूक जप्त करण्यात यावी. तसेच, सदरील इसमास तडीपार करणे आवश्यक झाले असल्याचे मत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नमूद निवृत्ती खेतमाळीस, राजेंद्र औटी व दिलीप औटी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा दिनांक १० फेब्रुवारी २२ रोजी पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

सदरील निवेदनाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयासह स्थानिक प्रशासनासही देण्यात आलेल्या आहेत. यावर नगरसेवक अंबादास बन्‍सी औटी, कोंडाप्पा दंडनाईक, बाळू शिंदे, सौ. राधाबाई हिरडे, नवनाथ पिंपळे, एकनाथ खेतमाळीस, अंबादास शिवराम औटी, सौ.सुभद्रा सप्रे, सिताराम लबडे, सौ.मालिनी लबडे, सौ.शकुंतला सप्रे, लक्ष्‍मण सप्रे, दादाराम औटी. सौ.जिजाबाई औटी, मारुती औटी, जगन्नाथ औटी, लहू औटी, संजय औटी, अशोक दातीर सह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी आहेत.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading