दिनांक ३० जानेवारी, श्रीगोंदा:
तालुक्यातील नगर/दौंड रोडवरील काष्टी येथे उसाची ट्रॉली आणि चार चाकी गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड महामार्गावर असलेल्या काष्टी गावामध्ये झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि चार चाकी गाडी दरम्यान धडक होऊन मोठा अपघात घडला. या अपघातात आरपीएफ जवान बाबत कारंडे मृत्युमुखी पडले आहेत. रोडवरून जात असताना ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ही धडक झाली. या दुर्दैवी घटनेमुळे दौंड रेल्वे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्युमुखी पडलेले जवान बाबासाहेब सूर्यभान कारंडे हे दरेवाडी तालुका नगर येथील रहिवासी आहेत. आज दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी शिवशक्ती दूध डेअरी जवळ हा भीषण अपघात झाला. कार ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जाऊन जोराने धडकली. यात घटनास्थळी अपघातग्रस्त कारंडे यांचा मृत्यू झालाय.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
