दिनांक ३० जानेवारी, श्रीगोंदा/दौंड:
ढाबा टाकण्यासाठी माहेरहून पैसे आनावेत यासाठी सासरच्या लोकांकडून लग्नानंतर अवघ्या सहा महिण्यातच तगादा लावला गेला. तिला पैसासाठी लाथाबुक्यांनी, मारहाण केली जात होती. उपाशीपोटी ठेवून छळ केल्याने, अखेर त्या नववधूने कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केली.
दौंड तालुक्यातील स्वामीचिंचोली येथील ही घटना असून, याप्रकरणी पतीसह तीघांवर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
शितल सत्यवान होले (वय ३२ रा. स्वामी चिंचोली. ता. दौंड. जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे.
शितलचा लग्नानंतर सहा महिन्यातच सासरच्या मंडळीकडून छळ सुरू झाला. माहेरहुन ढाबा टाकण्यासाठी १ लाख रूपये घेवुन ये..! म्हणत तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, वेळोवेळी उपाशी पोटी ठेवुन छळ केला गेला.
मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणुन, आईने तिच्या नवऱ्यास ४५ हजार रुपये गाडी घेण्यासाठी दिले. तरीही सासरकडील लोकांनी तीचा छळ सुरूच ठेवला.
अखेर तिने या जाचाला कंटाळून गुरूवारी दिनांक २७ रोजी रात्री राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला बारामती येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सासरच्या त्रासाला कंटाळूनच आपल्यामुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई, सौ.शारदा दत्तात्रय वाकडे (वय ६२ रा. आढळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिल्याने, तीचा नवरा सत्यवान किसन होले, जाव महानंदा भारत होले व सासु सुमन किसन होले (सर्व रा. स्वामी चिंचोली ता. दौंड जि. पुणे) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी भांदवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीसांनी माहिती दिली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
