श्री.सुवेंद्रजी दिलीप गांधी यांनी पॅनलचे नेतृत्व करत, निवडणूक लढवावी.!

दिनांक १७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

आज दिनांक १७ ऑक्टोबर २१ रोजी शहरातील कुकडीच्या शासकीय विश्राम गृहावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टी स्टेट बँकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा, विनिमय करून, सभासदांशी संपर्क करणेबाबत येथे विषय ठरवण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, नगर अर्बन बँकेच्या निवडणूकी संदर्भात कुकडी विश्रामगृह येथे आज दुपारी १:०० वाजता श्री.संतोषजी लगड यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकित चर्चा करण्यापूर्वी स्व.दीलीपजी गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर नगर अर्बन मल्टी स्टेट बँक निवडणुकी बाबत चर्चा, विनिमय होऊन, नगर अर्बन बँक निवडणुकी मध्ये मा.केंद्रीय मंत्री स्व. दिलीपजी गांधी यांचे सुपुत्र माननीय श्री.सुवेंद्रजी दिलीप गांधी यांनी निवडणूक पॅनलचे नेतृत्व करावे व त्यांच्या बरोबर येणाऱ्या सर्व संचालकानां समवेत घेवुन, सुवेंद्र गांधी यांनी निवडणूक लढवावी. असे मत नमूद बैठकीत सर्वानुमते मांडल्याची माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये श्री. राजेंद्र मस्के, संतोषजी लगड, राजेंद्रजी मोटे, सुनीलशेठ मुनोत, सुभाषशेठ मूनोत, भूषणजी बडवे, देवराव वाकडे, नंदकुमार कोकाटे, बाळासाहेब महाडीक, (सरपंच) सचिनजी गायकवाड, राजेंद्रजी कोठारी, दत्ता आबा जामदार, शांताराम वाबळे, बाळासाहेब बनकर, राहुल भंडारी, गोकुळ फराटे, गंगाराम तळेकर, सतीश गुंदेचा, शिवाजी पिंपळे, राजेन्द्र औटी आदी पदाधिकारी व समविचारी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(राहुल भंडारी)

जाहिरात:

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading