दिनांक १७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंद्यावरून कांदे भरून कोल्हापूरला निघालेला ट्रक, पुणे बंगळूर highway वर मलकापूर जवळील वारणा हॉटेलसमोर आला अनं अचानक ट्रक स्टेरिंगचा रॉड खराब झाला. स्टेरिंग काम करीत नसल्याने, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, तसाच तो ट्रक महामार्गाचे सुरक्षा रेलिंग जाळी तोडून, येथील सेवा रस्त्यावर पलटी झाला. त्यामध्ये श्रीगोंदयाचे दोघे जण होते. ते या अपघातात जखमी झाले आहेत.

या ट्रक मध्ये कांदा बागायतदार प्रणय जाधव (वय १९) तसेच, चालक नवानाथ मारुती भुजबळ (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) हे किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. अपघातची खबर मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खालिल इनामदार, श्री.जाधव, (हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज) दस्तगीर आगा, सिकंदर उघडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नमूद अपघातग्रस्त दोघांना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात पाठवन्यात आले. सेवा रस्त्यावरच ट्रक पलटी झाला. यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी होऊन विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नांनी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
