श्रीगोंदा तालुक्यातील या गावात मतीमंद मुलीवर अत्याचार.. दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल..!

दिनांक ३१ मे २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या पश्चिमेस १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात तीस वर्षीय मतिमंद महिलेवर गवतामध्ये जबरदस्तीने घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, दिनांक २७ मे २०२४ रोजी १:०० वाजनेच्या सुमारास या घटनेची फिर्यादी यांची मतिमंद नणंद ही त्यांचे घराजवळील शंकर नामक इसमाचे शेतात पपई आणण्यासाठी गेली असता, यातील आरोपी शंकर व दिपक (अडनाव जाहिर करता येत नाहीत) यांनी तीला हाताला धरुन शंकरच्या गीणीगोल गवतामध्ये जबरदस्तीने घेवुन जावुन तीचे अंगावरील कपडे काढुन तीचे तोंड दाबुन तीला हाताने मारहाण करुन, तीचेशी जबरदस्तीने शरीर संबध केले. वगैरे फिर्यादी वरुन भा.द.वि कलम ३७६(२)(जे)(एल), ३७६(ड), ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्हा सपोनि अजय गोरड यांनी दाखल केला असून, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समीर अभंग या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading