प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे नामांकित व्यक्तिमत्व बापूशेठ माने (BM) यांच्या वाढदिवसानिमित्त..  बांधकाम कामगार ते बांधकाम उद्योजक बापू माने.. यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा..

दिनांक १ जुन २०२४, श्रीगोंदा:

बाप्पू ते बापूशेठ माने उद्योजक/उद्योगपती हा मानेंचा खडतर प्रवास.. प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून, जमीन खरेदी विक्री आणि बांधकाम क्षेत्रातील प्रगतीसह सामाजिक चळवळीमुळे सबंध तालुक्यासह जिल्ह्यात नाव रुपाला आलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बापूशेठ माने..! बांधकाम कामगार, मजूर ते बांधकाम व्यवसायातील उद्योगपती हा प्रवास कसा केला..? याबाबत अनेकदा बाप्पू माने यांनी माध्यमांना आणि माध्यम प्रतिनिधींना सांगितले आहे. आज १ जुन रोजी त्यांचा वाढदिवस आहे.. त्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील सकारात्मक आणि संवेदना जागृत करणाऱ्या घडामोडीं अधोरेखीत करणारा लेख..

मागील दोन दशकांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामाजिक, राजकीय अभिसरणानंतर बाप्पू माने या कैकाडी समाजात जन्मलेल्या युवकाच्या कार्यकर्तृत्वाचा खरा आरंभ झाला. अनेक सकारात्मक, नकारात्मक घडामोडी घडत गेल्या. मात्र, न डगमगता आपला सामाजिक प्रवास माने त्यांनी चालु ठेवला. यात त्यांना खांद्याला खांदा देऊन चालणाऱ्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची साथ मिळाली..  समाजाशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व.. समाजाचे काहीतरी देणे लागते.. या उद्देशाने कार्यरत असणारे आणि उद्योगपती म्हणून चर्चेत आलेले बापू माने हे मात्र, दोन दशकांपूर्वी स्वतः प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले जीवन व्यतीत करत होते.

स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. यासाठी ते स्वतः बांधकाम कामगार म्हणून काम करत. पुढे फुले/आंबेडकर विचार मंचचे संस्थापक ॲड.संभाजीराव बोरुडे यांच्या आणि पुरोगामी विचारांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने, लोकांचे प्रबोधन आणि वास्तविक परिस्थिती जगा समोर मांडणे.. या मुख्य कार्यातून कायदा/सुव्यवस्था, संविधान, लोकांचे हक्क, प्रशासकीय कार्यालय, अधिकाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य त्याचबरोबर सर्वसामान्यांचे कायद्याने दिलेले अधिकार अशा वेगवेगळ्या विषयांवर या मंचच्या माध्यमातुन प्रबोधन केले जात..

या मुशीत बाप्पू माने तयार होत गेले. पुढे आर्थिकदृष्टया वेगवेगळ्या छोट्या मोठ्या उद्योगात सहभागी होत आपले नशीब आजमवण्यास सुरुवात केली. जमिनी खरेदी/विक्री, बांधकाम व्यवसाय सुरु करत असताना त्यांच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत गेला. दरम्यान त्यांनी समाजाप्रती असणारी आस्था सोडली नाही. समाजातील विशेषत: मागासवर्गीय, दुर्बल घटक, वंचित समूहासाठी जोमाने काम चालू ठेवले. त्यांच्या दातृत्वाची चर्चा सबंध जिल्हाभर होत राहिली. कोरोना काळामध्ये सफाई कामगार हे फ्रंट लाईन वर्कर मध्ये काम करत होते. परंतु , त्यांच्याकडे प्रशासनासह सर्वांचे दुर्लक्ष झाले. हे खरे संघर्ष योद्धा आहेत..! म्हणून सफाई कामगार महिला भगिनींचा त्यांनी साड्या वाटून सन्मान केला. अन्नापासून वंचित असलेल्या अनेकांना त्यांनी अन्नदान केले. अन्नदान करणे हेच सर्वात मोठे दानं आहे.. असे सद्दविचार मनाशी बाळगून बापू माने यांनी त्यांचे सामाजिक कार्य चालू ठेवले.

फुले शाहू आंबेडकर विचारांचा प्रचार आणि प्रसार हा त्यांच्या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. ॲड. संभाजीराव बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी श्रीगोंदा तालुका सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले आहेत. लोकांमध्ये खरा आंबेडकरवाद पोहोचवायचा असेल.. तर, संविधान समजणे गरजेचे आहे. म्हणून, त्यांनी शेकडो संविधानाच्या प्रती लोकांना, विद्यार्थ्यांना व चळवळीत कार्यकर्त्यांना विनामूल्य वाटल्या आहेत.

प्रत्येक अडचणीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सिद्धार्थ नगर येथील जिल्हा परिषद शाळा, जिल्ह्यात सर्वात जास्त मागासवर्गीय मुलांची वास्तविक लोकसंख्या असलेली एकमेव शाळा आहे. तेथेही त्यांनी मुलांना एक लक्ष रुपयांची एलसीडी स्क्रीन देण्याचे आश्वासन देऊन सामाजिक भान जपले.

सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंती साजरी करून स्त्रियांमध्ये वैचारिक जागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर विविध महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरा करून, त्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम वक्ते बोलवून त्यांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम श्रीगोंदा पंचक्रोषित आयोजित केले. हे सर्व करण्यासाठी बापू माने यांनी स्वतः सर्वतोपरी पुढाकार घेतला.

तरुणांमध्ये मैदानी खेळांप्रती उत्सुकता निर्माण व्हावी.. सदृढ तरुणाई संपुष्टात चालली असल्याने, क्रिकेट सारख्या खेळांना चालना देऊन बापु माने यांनी BM ग्रुपच्या माध्यमांतून तालुक्यातील विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या.. प्रोस्थानपर लाखों रुपयांची बक्षीसही जाहीर केले.

संत शेख महंमद बाबा हे श्रीगोंदा तालुक्यासह जिल्हा आणि राष्ट्र पातळीवर नावाजलेले सर्व धर्मियांचे ख्यातनाम श्रद्धास्थान आहे. येथेही सामाजिक दृष्टिकोनातून आपले द्रव्य आणि वस्तुरुपी मदतीचे आश्वासन मानेंनी पूर्ण केले.

समाजभिमुख काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावे लागले. आरोप.. प्रत्यारोपही होत गेले. पण, कसल्याही अडचणींना, नकारात्मक गोष्टींना मनाला न लावून घेता.. आपली सामाजिक आणि राजकीय वाटचाल त्यांनी चालू ठेवलेली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत गरिबीचे चटके सहन करत वाटचाल करणारा तरुण… ते BM ग्रुप आणि फुले आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून बापू माने हे बांधकाम व्यवसायातील तसेच सामाजिक क्षेत्रातील एक नामांकित आणि उल्लेखनीय नाव म्हणून तालुक्याबरोबर सबंध जिल्ह्यात लोकांच्या संवेदना जाणणारा.., सर्वसामान्यांना मदत करणारा.., खेळाडू आणि तरुणांना चालना देणारा.., शाळांना व विद्यार्थ्यांना मदत करणारा.., फुले/आंबेडकरी विचारांच्या माध्यमातून समाजात जागृती करणारा.., फुले – शाहू – आंबेडकर मंचच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कायदा सुव्यवस्था आणि आपले हक्क/अधिकार नमूद करणारं व्यक्तिमत्व म्हणून बापू माने सर्वांना ज्ञात झाले आहेत.

BM ग्रुपचे सर्वेसर्वा बापू माने यांची सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील प्रगती अविरत चालू राहावी.. यासाठी त्यांच्या मित्र, संबंधित, नातेवाईकांसह हितचिंतकांनी त्यांना या वाढदिवसा निमित्ताने सदिच्छा व्यक्त केलेली आहे. तर, लवकरच त्यांनी राजकारणात पदार्पण करावे.. व आगामी राजकीय क्षेत्रातही त्यांचे नावलौकिक व्हावे..! अशाही सदिच्छा काही मित्रांनी व्यक्त केलेल्या आहेत.

बापू माने यांना बहुजन समता पत्र NEWS PORTAL तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

फोटो गॅलरी:

सफाई कामगार महीला भगिनींना साडी देऊन सन्मान करताना..
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना संविधान प्रत भेट देताना..
सिद्धार्थ नगर येथील जिल्हा परिषद शाळेला मदत देताना..
सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंती कार्यक्रमात विचार मंचावर..
क्रिकेट स्पर्धा शुभारंभ करतांना..
गणपती मळा येथे देणगी देताना..
कैकाडी महाराज जयंती निमित्त उपस्थिती..
सिद्धार्थनगर येथे बुद्ध जयंती निमित्त उपस्थिती..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading